धन्यवाद श्री. नरेंद्र गोळे,

आपला मुद्दा जरूर विचार करण्याजोगा आहे.
संजय दत्तला जामीन मिळाल्या नंतरच्या, टीव्ही वरील, चर्चा बैठकीत कोणी आजी-माजी पोलीस महासंचालक आले होते. त्यांनी त्याचे स्पष्टीकरण असे दिले की बाँब स्फोट प्रकरणाचे काही १४ हजार पानांचे तपशील आहेत, ८०० च्या वर साक्षीपुरावे आहेत. कांही शे पानांचे आरोप पत्र आहे. एकाच्या निकाल पत्रातील 'शब्दांचा' दुसऱ्यांच्या खटल्यात चुकीचा अर्थ काढून वापर होऊ शकतो. प्रत्यक्ष  शिक्षा दोन ओळींची असली तरी 'निकालपत्र' कित्येक पानांचे होईल. ते तयार करताना वरील सर्व बाबींचा विचार करून भयंकर तोलून मापून शब्द वापरावे लागतील आणि त्या सर्वासाठी कित्येक दिवस लागण्याची शक्यता आहे.

असो. मला व्यक्तिशः कायद्यातले, कोर्टाच्या कामातले ज्ञान नाही. त्यामुळेच त्या चर्चेतील निष्कर्षांवर मी विश्वास ठेवला आहे.
मुळात, १९९३ सालच्या इतक्या महत्त्वाच्या खटल्यालाच इतकी वर्षे का लागावीत, असा निष्पाप विचार मनात येतो. माझ्या तर्कक्षेत्रा बाहेरील विषय आहे.