जगात फक्त बदल कायम असतो इतर काहीही नाही. आजारी असताना आईचा डोक्यावरून फिरणारा हात कितव्या वर्षापर्यंत? २४व्या ठिक आहे..४२व्या वर्षी आणि ५२व्या वर्षी काय? बऱ्याचजणांना महाविद्यालये, विद्यापीठे आणि शाळा यातली शाळा अधिक आवडते म्हणून शाळेत जाऊन पुन्हा बसता येत नाही. सदर लेखक उगीच कारणे देत बसला आहे असे वाटले.

आपलं स्वतःच आयुष्य कसं आणि कोठे जगायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यात अपराधी वाटण्यासारखं, कारणे देण्यासारखे आणि इतरांची चिंता वाहण्यासारखं काय आहे ते कळले नाही.

असो. छुपा भेद हा सर्वत्रच असतो, अमेरिकेतही.