त्याला जेल मधे टाकण्यापेक्षा त्याच्या कडुन काही कोटी रुपये दंड वसुल करावा. (हा दंड  सलमान व त्याच्याशी निगडित सिनेमावाले आनंदाने देतील. )

'आनंदाने देतील' असे म्हणणण्यातच   गुन्हा आणि शिक्षा हे समजून घेण्यातले वैफल्य दिसून येत आहे. गुन्हा तो गुन्हाच आणि त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. (नाहीतर उद्या कोटी रुपये भरा आणि हरण मारा दोन कोटी भरा आणि दोन हरणे मारा अशी योजनाही सुरू होईल.)

शिक्षा भोगून आल्यावर हवे तर प्रतिमाक्षालनासाठी त्याने (आणि सिनेमावाल्यानी) वन्य जीवांन्साठी कोट्यावधी रुपये द्यावे.

सलमानला जेल मधे टाकुन चिंकारा किंवा ई. वन्यप्राण्यांचा प्रश्न सुटणार नाही...

असे म्हणणयाने (तुमचा हेतू नसला तरी) कायदा शिक्षा न्यायालय पोलीस ह्यासगळ्याची कुचेष्टा आणि अवमूल्यन होत आहे असे वाटते.