अशा व्यक्ती आहेत. आणि अशा प्रवृत्ती सुद्धा. असे लेख न लिहिल्याने त्या प्रवृत्ती दूर होतील का? नकारात्मक काल्पनिक लेख म्हणजे काय? व्यक्ती काल्पनिक आहे पण विचार काल्पनिक नाहीत. असे विचार आपल्या समाजात आहेत. भलेही ते नकारात्मक असोत. ते मांडणं महत्त्वाचं. त्यावर उपाय शोधणं महत्त्वाचं.
लेटस नॉट पास द बक असं म्हणणं सोपं आहे. पण ज्या पिढीने त्यांच्या वडिलधाऱ्या पिढीला फक्त बक पासिंग करतानाच पाहिलं त्यांच्यात कुठून अचानक निर्माण होणार ही क्षमता. आपण सगळे बोल बच्चन आहोत. हाच खरा प्रॉब्लेम आहे. कृपया व्यक्तिगत घेऊ नका. पण आपण एवढ्या तडजोडी आपल्या आयुष्यात करतो की तडजोड मग ती धेय्याशी असूदे, देशप्रेमाशी असुदे किंवा नैतिकतेशी असूदे, ती समाजमान्य होत चालली आहे. मग ह्या अशा लोकांचं तरी काय चुकतं? तेही तडजोडच करतायत एक प्रकारची. तुमच्या आमच्या सारखी.