फ़ार छान!आणि अचूक

अ)
एखादी समस्या निराकरण करण्यासाठी पहिली दोन पावलं म्हणजे
१) समस्या आहे हे मान्य करणं
२) समस्येचं खरं मुळ शोधणे

या लेखावरील काही प्रतिक्रिया पाहुन पहिलं पाऊलही लोकं उचलायला तयार नाहित. 

ब)
माझ्या मते लेखात वर्णन केलेली मानसिकता पिढिसापेक्ष नाहि. माझ्यामते, जुन्या (स्वातंत्र्योत्तर काळात लगेच जन्म झालेले) पिढितील लोकांचीही अशीच मानसिकता आहे. ह्याचं हे अर्वाचीन (भाषेतलं) रूप मानता येईल.
"कोणत्याही समाजात निर्माण होते तशी "उद्देश" नसलेली पिढि तयार होत गेली. याचाच हा परिणाम" (इति: ए.पी.जे. अब्दुल कलाम. याच कारणासाठी त्याची व्हिजन२०२० दिलं. त्यांच्या मते उद्देशहीन समाज अधोगतीच करू शकतो.)

कोहम,
इतक्या महत्त्वाच्या विचारमंथनामा चालना दिल्याबद्दल धन्यवाद (आणि लेख तर फ़ारच वेगळ्या पठडितला.. 'प्रस्थापितांना' हादरवून सोडणारा म्हणतात ना तसला... आवडलं आपल्याला)