नया दौर.

आज अनेक वर्तमानपत्रांचे मथळे याच वृत्ताने भरलेले आहे. काल आम्ही सहकुटुंब दुरचित्रवाणी समोर तेच तेच वृत्त वारंवार पाहत होतो. मन अगदी तृप्त झाले. नकळतच पुस्तकामध्ये वाचलेला काश्मिर नजरेसमोर तरळत होता. कडवटपणा पण संपु शकतो हे पुराव्याने सिध्द झाले.
अर्थात ही सुरवात आहे. कालच्या शुभ आणि सुखद घटनेचे श्रेय मनमोहन सिंग, सोनीया आणि मुशरफ यांना दिले पाहिजे.
पंजाब, राजस्थान, गुजरात या राज्यातुन सुध्दा आता प्रवास झाला पाहिजे. विद्यार्थी, व्यावसायीक आणि आपल्यासारख्या लोकांचे येणे जाणे वाढले पाहिजे.
हजारो लोकांचे येणे जाणे झाले तर इतरही समस्या हळुहळु दुर होतील हे नक्की.

इन्शाल्ला.

द्वारकानाथ