माझी ही कल्पना कशी आली त्या विषयी थोडेसे..
एखादया गुन्ह्याला किंवा अपराधाला शिक्षा का असते? तर तो प्रकार परत घडु नये म्हणुन... जर कोणाला असे वाटत असेल की सलमान ला जेल मधे टाकुन हे प्रकार परत होणार नाही तर ती मोठी चुक आहे असे वाटते.
या उलट त्याच्या कडुन दंड वसुल केला तर वन्यजीवनाला नक्की फ़ायदा होईल. आणि हा दंड म्हणजे ३००-४०० कोटी रु. पाहिजे जो मोजताना सलमानची नशा पुर्णपणे उतरेल.
दंड हा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांना पर्याय असु शकत नाही.
शिक्षा अशी असली पाहिजे कि ज्याच्यामुळे असे गुन्हे परत घडणार नाहीत याची खात्री निर्माण झाली पाहिजे.