असे विचार आपल्या समाजात आहेत. भलेही ते नकारात्मक असोत. ते मांडणं महत्त्वाचं.

माफ़ करा पण जे विचार आपल्याला पटत नाहीत व विशेषता जे अयोग्य आहेत त्याला व्यासपीठ मिळवून द्यायचा खटाटोप / अट्टहास कशाला?

कुठल्याही व्यासपीठवर नकारात्मक नव्हे तर विधायक दिशा देणारे काम झाले पाहीजे. उद्या नकारात्मक विचार करणारा एखादा असे मनाशी म्हणाला "बघा हा लेख बघा, मला जे वाटतय तसेच अजुन इतरांनापण वाटयत, ह्याचा अर्थ मी असा एकटा नाही, अजुन आहेत." अशी समजुत करुन तेच विचार त्याने जोपासले व पुढच्या पिढीला दिले तर?? (असेच होतेय ना?) निदान लिखाणाच्या शेवटी जर का हे अयोग्य अशी जाणीव करुन दिली तर तुमचे दोन्ही हेतू (नकरात्मक विचारांची मांडणी व त्याचा फ़ोलपणा दाखवणे) नाही का साध्य होणार?

म्हणून म्हणले की आता पुढे काय? एकदा तुम्हाला वाटले असे विचार मांडावेत तुम्ही मांडलेत, पण आपल्यासारख्याने उपायपण सुचवायला हवेत, हे नकारात्मक विचार अयोग्य आहेत, प्रगतीला मारक आहेत ह्याची जाणीव तेथल्या तेथे करुन दिली पाहीजे.

त्यावर उपाय शोधणं महत्त्वाचं.

हे तुम्हाला पटत. मला पण पटत. तुम्ही अश्या नकारात्मक विचारांचे प्रतीनिधीत्व करत नाहीत ना, म्हणून म्हणले की तश्या लोकांना सकारात्मक विचार सांगणे हे काम आपण केले पाहिजे.

असो ह्या विषयावर इतकेच. कारण तुम्ही व मी दोघेही ह्या नकारात्मक विचारांना नाकारतो आहोत तर आपल्यात ह्यावर जास्त चर्चा कशाला?