मुळात ह्या लेखात घरापासून दूर असण्याची हळहळ आहे (होमसिकनेस्) जी समजण्यासारखी आहे. मग 'आपण तसे भारतातच राहिलो असतो, पण काय करणार, तिथे 'समान कायदा' नाही!' अशा तऱ्हेची विनाकारण अपोलोजेस्टिक बतावणी जी आहे, तिचे समर्थन करणे कठीण आहे.

आपलं स्वतःच आयुष्य कसं आणि कोठे जगायचं हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्यात अपराधी वाटण्यासारखं, कारणे देण्यासारखे आणि इतरांची चिंता वाहण्यासारखं काय आहे ते कळले नाही.

असो. छुपा भेद हा सर्वत्रच असतो, अमेरिकेतही

हा प्रियालींचा प्रतिसाद अत्यंत योग्य व सर्वस्पर्शी आहे. सर्व ठिकाणी कमीजास्त प्रमाणात असे उघड किंवा छुपे भेद असतात. ते हळूहळू ह्या लेखकाच्या लक्षात येतीलच. त्यात रडण्यासारखे काही नाही, ते समजून घेऊन आपण पुढे कसे जायचे, हे कळले की पुरे.