कोणी भारत सोडून जावे व परदेशात स्थायिक व्हावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.
अमेरिकेत सगळेच आलबेल आहे व तेथे ३६५ दिवस दिवाळी असते हा संभ्रम पसरवला जातो असे माझे मत आहे. 
तेथल्या काही मुलांबद्दल ऐकायला मिळाले, अत्यंत हट्टी, दुराग्रही, अप्पलपोटे, खोटारडे व जराही सामाजिक जाणीवांची भान नसलेली ही मुले असावीत असे वर्णनावरून वाटले.
तेथे आलेल्या नैसर्गिक आपत्तींत एकमेकांना मदत करण्याऐवजी लुटफाट केल्याचे ऐकीवात आहे (मुंबईत २६ व २७ जुलै २००५ ला एकमेकांना मदत केल्याचे लाखभर किस्से येथे आहेत !).
तुलना करण्याचा प्रयत्न नाही पण काही गोष्टी भारतातही अभिमानास्पद आहेत हे नमूद करणे येथे भाग पडतेय. मागे एका विपत्रात बरीच मोठी जंत्री आली होती पण सर्व लिहीत बसलो तर वेळ पुरायचा नाही.

जगातली सर्वात मोठी लोकशाही येथे आहे. स्वतःच्या सेक्युलॅरिझमचा डंका पिटवणाऱ्यांना हे माहीतच असावे की, एका शीख व्यक्तीला एका कॅथलिक बाईने; मुस्लिम राष्ट्रपती मार्फत हिंदू बहुसंख्य असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ देववली आहे. इतर देशांच्या राष्ट्राध्यक्षांचे गोडवे काय वर्णावे.....    

इथल्या १०००० वर्षापूर्वीच्या संस्कृतीने आजवर कुठल्याही देशाला आपले मांडलिक बनवले नाही. येथे कधीही गुलामगिरीची पद्धत (इसाप आठवतो का ?) नव्हती /नाही.

एकूण ३२५ भाषा - २१ प्रमुख भाषा, त्यातून ५६०० वर दैनिके, १५००० साप्ताहिके व २०००० मासिके ! जगातला सर्वात मोठा इंग्रजीचा वापर करणारा देश. गेल्या कित्येक वर्षांत सरासरी शैक्षणिक पातळीत सतत वाढ.

जगातली ४थी मोठी अर्थव्यवस्था - ८% जीडीपी रेट - ३ री मोठी सेना तरीही आजवर स्वतःहून कोणावरही आक्रमण केलेले नाही. जगातली सर्वात वेगाने वाढणारी औद्योगिक वाढ. सर्वाधिक डॉक्टर्स, संशोधक व अभियंते निर्माण करणारा दुसरा देश.

जगातला भ्रमणध्वनी वापरणारा सर्वात मोठा देश. महिन्याला १५०००० भ्रमणध्वनी विकले जातात (तरीही दर सर्वात कमी !) , महाजालासाठी सर्वात मोठी (रुंद) बँडविडथ वापरणारा देश. १९८७ साली अमेरिकेने नकार दिल्यावर स्वतःचा "परम" हा सुपरकॉंप्युटर बनवणारा जगातला ३ रा देश. भारतातला औषध उद्योग जगात ४थ्या क्रमांकावर आहे व दिवसेंदिवस वर चढतोय. अर्थव्यवस्था खुली होताच कित्येक भारतीय उद्योजकांनी बाहेरचे उद्योग "विकत" घेतले आहेत.

सहावा देश जो स्वतःचा उपग्रह स्वतःचा हिमतीवर अंतराळात सोडतो. ईनसॅट मालिका दळणवळण उपग्रहांमधील सर्वात मोठी उपग्रह मालिका आहे. स्वतःची क्रायोजेनीक इंजिन बनवून जी एस एल व्हि सोडणारा एक देश ज्यातल्या बिपीओ व कॉलसेंटर्स ना जगात प्रथम क्रमांकाची पसंती आहे.

२५०च्या वर विद्यापीठे, १५०० संशोधन केंद्रे, ११००० उच्चविद्या शिक्षण केंद्रे व त्यातून बाहेर पडणारे २ लाख अभियंते व इतर ३ लाख टेक्निकल ग्रॅज्युएट्स.

आय आय टी तल्या विद्यार्थ्यांना जगभरात प्रथम पसंती !

सर्वात प्राचीन व सर्वप्रथम आधुनिक आयुर्विज्ञान प्रणाली, योगविद्या व विविध नॅचरोथेरेपीचा जनक देश.

शून्य व गणिताचा निर्माता-

भारत !

आज कदाचित चित्र धूसर असेल पण जर मनोगतावरील हा प्रतिसाद पुढच्या दहा वर्षांपर्यंत टिकल्यास वाचकांनीच ठरवावे की भारताने किती जोरदार मुसंडी मारली आहे ते !