वरदा,

तुम्ही म्हटले आहे ते बरोबर आहे. मी ही वाक्यरचना तुम्ही उल्लेख केला आहे तिथेच फक्त वाचली आहे. ती त्या भागातील बोली असेल.

पुढील उदाहरणे पहा.

अमाप पीक घेतले जाते.

अमाप पिके घेतली जातात.

अनेक गोणी डोक्यावर घेतल्या जातात.

असे विचारले जाते.

अशा शंका विचारल्या जातात.

पीक, पिके, गोणी, असे, शंका ह्या कर्त्यांप्रमाणे क्रियापद घेतले जाते, घेतली जातात, घेतल्या जातात इ. असे बदलते. हे व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर आहे. अर्थात बोलीभाषेला हे व्याकरण लावता येईल की नाही याची मला कल्पना नाही.

मीरा