रचना चांगली आहे. म्हणजे शार्दूलविक्रीडितात कविता लिहिणे, तीही शब्दांची ओढाताण न करता, हे काम सोपे नसते. ते तुम्हाला साधले आहे. भीतीचे वातावरणही चांगले निर्माण झाले आहे. म्हणजे काचेतली बाहुली, पायाखाली गार गार इत्यादी. मात्र कलाटणी जरा प्रभावी आणि नाट्यमय असती तर सुनीत म्हणून ही रचना अधिक चांगली झाली असती असे वाटते.