`मी जे लिहितो ते दमदार आहे अशा भ्रमात जसे अनेक लेखक असतात. त्याप्रमाणेच मला जे काही आवडते ते 'हायक्लास लिट्रचर' आहे अशी अनेक वाचकांची गैरसमजूत असते. '
एका चर्चेवरला हा प्रतिसाद... आवडले तेच हायक्लास, हा जर कुणा वाचकांचा गैरसमज असेलच, तर तो दूर व्हावा, आणि सर्वांनी साहित्याच्या या प्रांताचा केवळ निखळ आनंद घ्यावा, असं वाटलं, म्हणून तो प्रतिसाद! वाचकाच्या प्रोत्साहनातून लेखकाला मिळणारी प्रेरणा पुढे वाचकालाही आनंददायी ठरते.
-गैरसमज नसावा, आणि लेखनाचा निखळ आस्वाद घेताना अन्य फाटे फुटू नयेत, या अपेक्षेने.