`मी जे लिहितो ते दमदार आहे अशा भ्रमात जसे अनेक लेखक असतात.  त्याप्रमाणेच मला जे काही आवडते ते 'हायक्लास लिट्रचर' आहे अशी अनेक वाचकांची गैरसमजूत असते. '

वेगळ्या संदर्भात लिहिलेले माझे वरील वाक्य भलत्याच संदर्भात (आउट ऑफ़ काँटेक्स्ट) उद्धृत करून तुम्ही केलेला खोडसाळपणा आवडला.  [   आपल्या माहितीसाठी:  वरील 'अनेकांत' माझा समावेश नाही. मला जे आवडते ते सगळेच  'हायक्लास लिट्रचर' असावे, असते असे मला वाटत नाही.  ]

सुबोधिनीताई, तुम्हाला वरील 'एक दिवस..' तुम्हाला का आवडली ते तुम्ही हिरिरीने बाजू मांडून सांगा ना. केवळ कोणा एकट्याच्या प्रतिसादाने कुणी लेखक हिरमुसून  जात  असल्यास काय करावे. तसे झाले असल्यास, मी माझे शब्द मागे न घेता दिलगिरी व्यक्त करतो. असो. वाचकांना निखळ आनंद आणि निखळ आस्वाद घेता यावा म्हणून कुणीही परखड मते व्यक्त करू नयेत, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय?