मतला सुंदर आहे. आणि मक़्ताही. मध्यल्या शेरांतल्या कल्पना छान आहेत. 

दिधले, तव, तुज अशक्यच असेल तोपर्यंत टाळावेत का? रूपगर्विता, अप्सरा, प्रेमभारे, देवे यासारखे शब्द खटकतात का? भाषा २००५ ची वाटायला हवी का?

प्रणाम ऐवजी सलाम झाले चालले असते का. आणि जसा मतला अगदी मराठी मातीतला वाटतो, तसा मक़्ता वाटतो का?

असे प्रश्न माझ्या मनात आले.

– गाणारा कडुनिंब