विश्वास बसत नाही. कदाचित अतिशयोक्ती नसेलही. पण अशा माणसाला कमीतकमी त्वचा रोग तरी होणारच.
चीनच्या माओत्सेतुंगला म्हणे कोणीतरी सांगितले होते की राजाने दात घासल्यास त्याचे आयुष्य कमी होते. म्हणून त्याने कधीच दात घासले नाहीत. पण तोही दातांच्या स्वच्छतेसाठी कांहीतरी जडीबुटी चघळायचा. हे त्याच्या खाजगी डॉक्टरने आत्मवृत्तात लिहून ठेवले आहे.
इतका कसा घाण राहू शकतो, अगदी पशू सारखा
पशू अस्वच्छ राहत नाहीत. वाघ-सिंहांपासून पाळीव कुत्र्या-मांजरांपर्यंत सर्वच प्राणी स्वत:चे (आणि स्वतःच्या पिल्लांचेही...) अंग चाटून पुसून साफ करतात. पक्षी सुद्धा स्वतःच्या (आणि जोडीदाराच्या) अंगावरील घाण कचरा चोचीने साफ करतात.
साप वस्ताद. ठराविक काळानंतर तो आपली त्वचाच बदलून टाकतो. त्यासाठी तो एखाद्या सापटीतून असा जातो की त्याची बाह्य त्वचा शेजारील वस्तूवर घासून अडकून निघून येते. नुकतीच कात टाकलेला साप त्याच्या नवीन त्वचेमुळे एकदम चमकदार दिसतो.