तो सकाळी रोज 7 ला उठत आसे. उठल्या उठल्या तो पहिले काहीतरी खात आसे. खाणे पिणे ज़ाले की स्वारी परत बेड वर ताणून देत आसे. मग साहेब डाइरेक्ट 11 वाजता उठत. परत एकदा किचन मध्ये जायचे आणि दाबून खायचे आणि मग बेडरूम मध्ये जायचे आणि इंटरनेट वर काहीतरी टाइम पास करायचा, गाणे ऐकायचे, तो पर्यंत 2 वाजायचे मग साहेबांना परत भूक लागायची, परत एकदा स्वारी किचन मध्ये यायची. जेवण करायची आणि मग परत एकदा बेडरूम मध्ये जायची आणि मस्त ताणून द्यायची. मग स्वारी डाइरेक्ट 6 वाजता उठायची आणि मग जरा काहीतरी चहा ब्रेड खायची आणि मग बाहेर चक्कर मारायला जायची.

अमेरिका या प्राण्याला फुकट पाळत होती का? म्हणजे कामधंदा काही नाही? घरातच खाटल्यावर बसून ४ वेळा खाऊन उदरनिर्वाह कसा चालत होता?

अमेरिकेत अनेकजण पैसा वाचवायच्या वेडाने झपाटले की असे प्रकार करतात (असे म्हणजे कपड्यांचे दोन जोड इ.) हे वाचून होते पण दिवसातून ५० वेळा तोंड धुणारा माणूस (अगदी तो वॉशबेसिन खराब करत असला तरी) दोन महिन्यात आंघोळ करत नाही हे कसे?