भारतातील वसतिगृहातील वास्तव्यात अशी अनेक वल्ल्या अनेकांच्या पाहण्यात आल्या असाव्यात. अमेरिकेतील वास्तव्याचे महत्त्व कळले नाही. लेखक अमेरिकेत वास्तव्यास गेल्यामुळेच कदाचित त्याच्यावर असा इसम गुदरला असावा, असे उगाच वाटून गेले.  अर्थात अमेरिकेत गेल्यावाचून कळणार नाही म्हणा. हट, आता संधी मिळाली तरी अमेरिकेत कधी जाऊच नये असे अनेकांना उगाच वाटून जाऊ शकते.

अमेरिका या प्राण्याला फुकट पाळत होती का? म्हणजे कामधंदा काही नाही? घरातच खाटल्यावर बसून ४ वेळा खाऊन उदरनिर्वाह कसा चालत होता?

अमेरिकेत अनेकजण पैसा वाचवायच्या वेडाने झपाटले की असे प्रकार करतात (असे म्हणजे कपड्यांचे दोन जोड इ.) हे वाचून होते पण दिवसातून ५० वेळा तोंड धुणारा माणूस (अगदी तो वॉशबेसिन खराब करत असला तरी) दोन महिन्यात आंघोळ करत नाही हे कसे?

प्रियालीताईंशी पूर्णपणे सहमत