शेंगदाण्याच्या चटणीची कृती वाचून मन एकदम भूतकाळात गेले. (तसे ते बऱ्याच वेळा तिथेच असते म्हणा!) शेंगदाण्याची चटणी, साईचे दही, हिरव्या मिरच्याचा ठेचा, भाजलेली मक्याची कणसे, हुरडा, गुऱ्हाळावरचा रस, ताजा गूळ आणि चिक्की, उन्हाळ्यात लसूण आणि कोथिंबीर घालून केलेली नाचणीची आंबील, तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी, लेकुरवाळी भाजी, घरी काढलेल्या लोण्याचा गोळा, खरवस..... असे काही आठवून मन सैरभैर झाले! कृती फारच आवडली.
अवांतर: पाटा वरवंटा, उपास, भगर हे अमेरिकास्थित रोहिणीताईंच्या प्रतिसादात वाचून मी खुर्चीतून खाली पडायच्या बेताला आलो. तसेच त्यांना तिथे चांगल्या ओल्या शेंगा मिळतील की नाही या काळजीने चिंतातूरही झालो.
अति अवांतर: तुमचे डिस्क्लेमर आवडले. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करु नये, हेच बरे!