कविता, आशय आणि विषय, सारेच अप्रतिम!

वंचितांच्या वेदना वाटून घेऊ दे
दुःख माझ्याही जरा वाट्यास येऊ दे
हे मला इतके करू दे दुःखितांसाठी !

हे विशेष आवडले.

हे वाचून एक एक प्रसंग आठवला. माझ्या लहान पणी एकदा आमच्या घराची काही दुरुस्ती चालू होती. एक मजूर डोक्यावर विटांनी भरलेले घमेले घेऊन चालला होता. तो भार सहन न होऊन भेलकांडून पडला. दोन चार विटाही फुटल्या. तर मी त्याच्यावर ओरडलो. जवळच माझी वडील उभे होते. त्यांनी शांतपणे पुढे होऊन त्या साऱ्या विटा,
तुकडे पुन्हा घमेल्यात भरले, ते घमेले माझ्या डोक्यावर ठेवले आणि त्या मजुराप्रमाणे मला ते काम करायला लावले.
माझ्या वडिलांनी मला दिलेला हा वस्तुपाठ मी जन्मभर जोपासत आलो.