एक पाककृती येथे सापडली. मात्र आम्ही घरी करतो त्यात कंदमुळे (अनुपलब्धतेमुळे) घालत नाही. गरम गरम आंबील खाण्यास मजा येते.

"बाई मी भोळी... आपण खाते पुरणपोळी... नवऱ्याला घालते आंबील शिळी "असे म्हटले असले तरी गरम गरम आंबील कधी कधी पुरणपोळीच्याही तोंडात मारते.