आंबील दिसायला साधारण पातळ स्वीट कॉर्न सूपप्रमाणे, किंचित गडद असते. पण आंबील आणि स्वीट कॉर्न सूप म्हणजे शमशाद बेगम आणि शारदा अशी तुलना. नाचणीचे पीठ पातळसर करुन ते रटारटा शिजवावे. त्याला ठेचलेला लसूण, मीठ, जिरे आणि कोथिंबिरीचे वाटण लावावे. मिश्रण चांगले शिजले की गार होऊ द्यावे आणि फ्रीजमध्ये ठेवावे. आयत्या वेळी त्यात ताजे गार ताक घालून सारखे करावे. वैशाखवणव्यात दुपारच्या जेवणात आंबील असली की स्वर्ग हाताशी आल्यासारखे वाटते. फक्त पुढचे तीन तास रिकामे असावे लागतात!