माझ्या माहेरच्या घरात एक लाकडी कपाट आहे. भिंतीवर बसवलेले आहे. ते माझे आणि माझ्या बहिणीचे अभ्यासाचे कपाट होते. त्या कपाटातून आतून कोणीतरी ठकठक करतंय असा आवाज येई (कपाट बंद असताना). आम्ही दोघीनी हे कैक वेळेला अनुभवले आहे. गंमत म्हणजे आम्ही घर बदलले तरिही त्या कपाटातून अजूनही अधून मधून असा आवाज येतोच. पण यामागे भुताटकी वगैरे असण्याची शक्यता वाटत नाही. पण कारणही अजून कळलेले नाही.