इथे जॉर्जियात अटलांटाबाहेर थोडे ग्रामीण भागांत गेल्यास रस्त्याकाठी शेताबाहेर वगैरे मिठाच्या पाण्यात उकडलेल्या शेंगा विकत मिळतात, त्या अगदी घरच्यासारख्या लागतात. किंमत डॉलरमध्ये असते, इतकाच काय तो फरक. (शेंगदाणे हे जॉर्जियातले पारंपारिक पीक आहे. आणि हो, जिमी कार्टरही इथलाच, आणि तोही भुईमुगाचा शेतकरी होता.)