त्या कपाटातून आतून कोणीतरी ठकठक करतंय असा आवाज येई
मग तुम्ही जोरात 'कोण आहे तिकडे?' असं विचारून नाही का पाहिलं? मी विचारून पाहिलं होतं (वरचा प्रतिसाद) आधी झोपेत असल्याने मराठीत विचारलं, मग म्हटलं भुताला मराठी कसं कळणार म्हणून इंग्रजीत विचारलं तेव्हाही उत्तर नाही आलं तसं मोडक्यातोडक्या स्पॅनिशमध्ये विचारलं पण भूत मुकं असावं किंवा परभाषक असावं. उत्तर द्यायला तयारच झाले नाही. असो.
विनोद बाजूला सारून, तुम्ही खरंच काही केलं नाहीत का त्या कपाटाचं? म्हणजे छाननी इ.?