मराठीतुन कामकाजाची मागणी.

ठाण्याच्या वकीलांच्या संघटनेने न्यायालयीन कामकाज मराठीतुन चालावे अशी मागणी केली आहे. सर्वसामान्य लोकांना न्यायालयात इंग्रजीतुन चालणार्‍या कामाचा बराच त्रास होत असतो आणि त्यासाठी कार्यालयीन कामकाज मराठीतुनच चालवावे अशी सार्वजनिक मागणी या संघटनेने केली आहे.

संदर्भ : म.टा. दिनांक ०५.०४.०५.

अशीच मागणी इतर गांवाच्या वकीलांनी, वैद्यक क्षेत्रातील औषध विक्रेत्यांनी केली तर बरे होईल. अनेक डॉक्टर्स इंग्रजीतुन औषधे लिहुन देत असतात. अशिक्षित रुग्णाला काय घ्यावे हेही समजत नसते. सर्वांनी मराठीतुन औषधोपचार लिहण्याची विंनती केली तर डॉक्टर्संना सुध्दा ती मागणी मान्य करावी लागेल.