वाचकांनी गूगलवर शोध अवश्य घ्यावा. दोन्ही ठिकाणी त्यांना माझ्या चित्रामधील पहिला ध्वज दिसेल. अत्यानंद यांनी दाखवलेल्या चित्रामधील 'भाजप'च्या चिन्हातील एकसारखी आठ कमळे, छापील अक्षरे आणि चमकते रंग पाहून निदान मला तरी त्यांचा निर्णय पटत नाही. तशा प्रकारचे रंग त्या झेंड्यात असू शकतील, पण तो शंभर वर्षांपूर्वीचा ध्वज असणार नाही. ते संगणकावर तयार केलेले चित्र आहे असे ते चित्र पाहून मला वाटले. यासाठीच मी भक्कम आधाराचा शोध घेत आहे.
अर्धवट माहितीवर विसंबून राहून वाटेल ती गोष्ट जाहीरपणे ठोकून देण्याच्या प्रवृत्तीकडे लक्ष वेधण्यासाठीच मी या चर्चेचा प्रस्ताव मांडला होता.