पार्वतीने डाव्या अंगाचा मळ काढून एक छोटी मुर्ती तयार केली व त्यात नंतर जीव भरला. तो झाला गणपती. मग पार्वतीने किती दिवस अंघोळ केली नसेल? मूळात सारखी अंघोळ कोण करतो जो सारखा घाण होतो तो. पण त्याचा उद्देश प्रामाणिक असतो. स्वच्छ होण्याचा त्यामुळे माफ. हल्लि कपडे पण ड्रायक्लीन करतात. मग मळकुट्या काढून ड्रायक्लीन केलेले काय वाईट? तेवढीच राष्ट्रिय संपत्तीची बचत. हॅ! हॅ! भारतीय समाजात व्यक्तिगत स्वच्छतेबाबत आग्रही असणारी माणसे(अर्ध्या बादलीत बुडबुड अंघोळ करतील) सार्वजनिक स्वच्छतेबाबत मात्र अतिशय उदासीन असतात. (कार्यालयांतील सार्वजनिक स्वच्छतागृहे पहावीत). पुर्वी आमच्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात बुच नावाचा माझा गुजराथी पार्टनर अंघोळ सहसा करित नसे. [प्रत्येक दिवशी वेगवेगळा अवयव धूत असे]. रुम मध्येही स्वच्छता नसायाची. पण उत्कृष्ठ रुम म्हणून आपल्या रुमला बक्षीस मिळाले पाहिजे ही मात्र इच्छा. तपासणीच्या वेळी रुम चकाचक ठेउन खोलीभर स्प्रे मारला होता. पण बक्षीस काही मिळाले नाही.{इतर दिवशीचि परिस्थिती लोकांना माहीत होती} वसती गृहातील इतर स्वच्छतेच्या कल्पना येथील सभ्यतेस धरुन नाहित.