मनोगत हे साहित्यरसिकांच्या सौहार्दाचे केंद्र व्हावे, असे वाटते, त्यामुळे, चित्त यांच्या परखड मतस्वातंत्र्याच्या आग्रहाबद्दल मी सामान्य वाचक म्हणून असहमत आहे.

--- हे विधान वाचून वाईट वाटले. सौहार्द म्हणजे केवळ गोड,गोड परस्परस्तुती? पुरणपोळीची चव घेतल्यावर 'साखर कमी किंवा जास्त झाली आहे' हे सांगणे म्हणजे अरसिक परखडपणा तर 'वा,छानच' असे मनात नसतानाही,तोंडदेखले  म्हणणे हे 'सौहार्द'?खऱ्या सौहार्दात 'यावेळी अजिबात जमलं नाही' हे सांगणे अधिकारच नव्हे कर्तव्य देखील असते.
सारखा 'वन्स मोअर' देणाऱ्या 'रसिका'ला (आधी आनंदीत व नंतर त्रासलेल्या) गायकाने आणखी किती'वन्स मोअर' देणार? असे विचारल्यावर 'जोवर तुम्ही नीट गात नाही तो पर्यंत!' असे उत्तर मिळाले होते!" विनोदाचा भाग सोडल्यास, मी जर तो गायक असतो तर हा रसिक मला 'परखड सुह्रुद' वाटला असता!

जयन्ता५२