चक्रपाणि,
अलविदा!
तू हि गझल'पेठ' सोडून विडंबन 'कँपात'' गेलासच ना! केशवाच्या रचना वाचून 'कँपात' अधिक गमती व सुविधा.. आहेत असे वाटणे साहजिकच आहे म्हणा! पण 'निदान शनिवारी-रविवारी तरी घरी येत जा हो, बाळ!' अशी (स्फुंदत) विनंती!
तेथील 'हरित-पत्र' घेण्याचा विचार तर नाही ना?
अर्थात, तेथेही 'कळप-सुधारकाची' नितांत गरज होतीच! त्या समाजालाही 'बार-बाला-बायको-बाप-बदडणे' च्या विळख्यातून बाहेर काढणे आवश्यक झाले होते. तुला ह्या कार्यात 'यश मिळो' अशी ईशचरणी प्रार्थना!

(जयन्ता५२