'ऑरगॅनिक' = कोणतीही रसायने अथवा हॉर्मोन्स न वापरता नैसर्गिक पद्धतींनी उगवलेले
मला वाटते 'वाढवलेले' हे अधिक बरोबर आहे. यात रासायनिक खते, कीडनाशके वगैरेही आली. 'गावरान' चा अर्थ पिकाची जात किंवा वाणाशी आहे. त्या त्या भागात प्रचलित गावठी जातींना गावरान जाती म्हणतात. 'गावरान' चा संबंध पिकांच्या जातीशी आहे, तर 'ऑरगॅनिक' चा पीक वाढवण्याच्या पद्धतीशी.