आमच्या गुर्जर बंधूंनी ज्याप्रमाणे गरब्याचे यशस्वी बाजारीकरण (मार्केटिंग) केले तसेच जर दहीहंडीचेदेखील झाले आणि गोविंदा-पथकांच्या हातात चार पैसे पडले तर बिघडले कोठे?

उलट मला तर वाटते की, केवळ एक दिवसाच्या दहीहंडी ऐवजी दहीहंडी सप्ताह पाळावा. पहिले सहा दिवस कमी उंचीच्या प्रोत्साहनपर हंड्या लावाव्या आणि शेवटच्या दिवशी महाऱ्हंडी लावावी.

ठाण्यातील एका संयोजक संस्थेने या वर्षी गोविंदा-पथकांसाठी अपघाती विमा योजना राबविण्याचे ठरविले आहे. जर सर्वच संस्थांनी तसे केले किंबहुना तशी कायदेशीर सक्तीच झाली तर कुणाचा काही आक्षेप असण्याचे काहीच कारण राहणार नाही.

सध्या बहुतेक संयोजक संस्था विविध राजकीय पक्षांशी संबंधीत आहेत हे खरे. परंतु एकदा व्यवस्थित बाजारीकरण झाले की इतर जण आपसूकच येतील!