तुमची भूमिका कळली. त्यातील काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत, पटणारे आहेत. तुमची तळमळही त्यातून पोचली. 'मनोगत हे साहित्यरसिकांच्या सौहार्दाचे केंद्र व्हावे,' ह्याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. लेखकाला किंवा कुणाला दुखवायचे नाही असे ठरवून प्रतिसाद द्यायला हवे, लेखन करायला हवे असेच वाचून वाटले. आजकाल कळत-नकळत आपले बहुतांश प्रतिसाद त्यामुळेच छानछान, 'सौहार्दपूर्ण' झाले आहेत की काय असे वाटून गेले. ही सौहार्दाची दहशत नाही तर काय?