आपण सुचवलेल्या गोष्टी अंमलात आणायला काही आडचणि आहेत. औषधांचे मराठीत नाव लिहायचे कसे? जर त्या औषधाचे व्यवसायीक नाव इंग्रजीमधून असेल तर त्याचे भाषांतर कोण व कसे करणार? (सोपे उदाहरण विक्स.. कठीण उदाहरणांची तर कमतरताच नाही). वैद्यकशास्त्रातील सर्व परिभाषांसाठी मराठी प्रतिशब्द आहेत का? (आयुर्वेदिकच नव्हे तर युनानी, होमिओपॅथी (????) ऍलोपॅथी(????) लॅटिन/ग्रीक शिकून वैतागलेल्या वैद्यांनी (डॉक्टर हो..) अशा कितीशा संज्ञा लक्षात ठेवायच्या... (अशी अज्ञावली तयार करायला आपले संगणक तज्ञ एका पायावर तयार होतील पण औषधविक्यांनाही हे शिकावे लागेलच ना?)

पहा.. असे प्रत्येक उत्पादनाला प्रादेशिक नाव द्यावे लागले तर त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा नाही का लागणार?

याचे मूळ हे विक्रय व्यवस्थापनात जाते असे मला वाटते.. जोवर आपण मराठीतून जाहिरात केली गेलेली उत्पादनेच घेण्याचा प्रण करीत नाही व ज्या उत्पादनांचे नाव मराठीत आहे त्यांनाच प्राधान्य देत नाही तोवर हे असेच चालायचे. पण याची व्यवहार्यता काय?

मी आशुतोष