कुठे आहे, याचा नंतर मीही शोध घेऊ लागलो... पण या प्रश्नाचे उत्तर मला सापडले नाही. माझ्या मनातली कल्पना खूप मोठी होती कदाचित. पण तिला पंख पसरता आले नाहीत, असे प्रतिसादांवरून (आणि त्यातून झालेल्या चर्चेवरून) वाटते. त्यामुळे, एकूणच, कविता या विषयावर चर्चा झाली, तर चांगली कविता, नेमकी कविता, आणि मुळात, कविता म्हणजे काय, ती कशी असावी, या विषयांवर ते माझ्यासारख्याला मार्गदर्शक ठरेल. कृपया, टीकेचे मलातरी वावडे नाही.