हे भारतीय (८५% हिंदू धरून) कशासाठी 'त्या' काश्मीरला जातील? इथल्या भडक हिंदुत्ववादाला कंटाळून? कि आपल्याला हिंदूंनीच भारतातून निघून तिथे दुसरा भारत वसवावा अशी अपेक्ष्या आहे? ज्यांचे नातलग/हितसंबंधी त्या काश्मीरात आहेत त्या मुसलमान भारतीयांनीच या बस सेवेचा लाभ घेणे योग्य नव्हे काय? इथे ही धर्माधिष्ठीत आरक्षणाचा हट्ट का? मग मी तर ३०% द्रविडी लोकांनाही न्यावे म्हणतो...त्यांनी तरी काय घोडं मारलंय?
मराठी मुसलमानांनी इन्शाल्ला साठीहि मराठी प्रतीशब्द वापरणे अपेक्षित आहे काय?
शिवसेनेने नक्कि काय काय करणे अपेक्षित आहे? मराठीच्या ध्यास सोडून मुंबईचा ध्यास घ्यावा कि काश्मीरचा घास?
देवकृपेने आम्हास प्रत्येक गोष्ट 'हिंदुत्वाच्या' चष्म्यातून पाहण्याची सवय लागू नये इतकीच प्रार्थना.................... आमीन..
मी आशुतोष