तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. तुमचे म्हणणे समजण्यासारखे आहे. फक्त जरा कुणालाही अमुकवादी/तमुकद्वेष्टे असे आरोप न करता सौम्यतेने लिहिलेत तर विवाद बोधक होईल, आणि होत राहील; अन्यथा तुमच्यावरही तमुकवादी/अमुकद्वेष्टे असा काही शेरा मारला जाईल आणि नंतर वाद एकतर्फी होत राहील अशी भीती वाटते.