मनातल्या रामावर रावणाने मात केली? नको... ईतक हरल्या सारख गंमतीत तरी का? मनातल्या रावणावर कशी मात करायची हेच मग विसरल जाणार की. बेकार असूदेत नाहीतर नसूदेत, रावण कुठल्या तरी रूपाने असतोच की मनात प्रत्येकाच्या. कधी सरळ जाणवतो तर कधी ईतरांना शोधावा लागतो. सापडला तर  जाणीवपूर्वक दूर करायचा कसा ते सांगा की. राम जरी अगदी निर्माण होत नसेल तरी जरा बरा अन सकारात्मक माणूस तरी निर्माण होऊ शकतो अन त्यांचीच तर गरज आहे की.