नागपंचमी आणि डिसेंबरात? ही महानागपंचमी दिसते. असो. जातिनिहाय मेळावे, संमेलने घेणे घटनेच्या विरोधात नाही. किंबहुना घटनेने तसे मूलभूत अधिकार आम्हाला दिलेले आहे.
या कारणामुळेच आंतर्जातीय, आंतरधर्मीय व आंतर्देशीय विवाह करण्यात चित्पावन आडनांवांचे लोक आघाडीवर दिसतात. बिगरचित्पावन पुरुषांबरोबर लग्न केलेल्या महिला किंवा चित्पावन पुरुषांबरोबर लग्न करून आलेल्या स्त्रिया आणि हा मिश्रविवाह केलेल्या दांपत्यांची संतती या महासंमेलनात भाग घेऊ शकतील काय?