अशा संमेलनांची आपल्या देशात आवश्यकता आहे का? प्रतिज्ञा करताना, "सारे भारतीय माझे बांधव आहेत" , आणि इकडे ही असली संमेलने भरवायचे?

समजा या समेलनाने चित्पावन लोक (किंवा वंश) अधिक हुषार आहे असे सिद्ध झाले म्हणजे मग काय होईल? त्याने काय फरक पडणार आहे?

या असल्या संकुचित वृत्तीमुळे हिंदू धर्माचे अतोनात नुकसान झाले आहे.. इतिहासापासून आम्ही काहीच शिकणार नाही का?

अशा प्रकारच्या जातिनिहाय कार्यक्रमावर घटनेने बंदी आणायला हवी.

अतिरेकी वाटेल, पण म्हातारी मेल्याचे दु:ख नाही हो, काळ सोकावतोय......!