छान लेख. लहानपणची आठवण झाली. माझी आई श्रावणी सोमवारी उपास सोडताना संध्याकाळी नैवेद्यामधे भाजणीचे (थालिपीठाच्या भाजणीचे नव्हे) वडे व लाल भोपळ्याचे गूळ घालून घारगे करायची त्याची आठवण झाली. तुम्ही दिलेल्या छायाचित्रात केळीचे हिरवेगार पान व त्यावरचे पदार्थ पाहून मन प्रसन्न झाले.

संत सौरभ,

श्रावणामधे दर शुक्रवारी जिवतीची पूजा करतात. ही पूजा  घरातील मुलांकरता केली जाते. पुरणाचा नैवेद्य करून पुरणाच्या ज्योतिने मुलांचे औक्षण करतात.