जिन्नसात दिलेल्या सर्व डाळी व तांदुळ भिजवुन, सुकवुन मिक्सरमधे दळल्यास चालण्यासारखे आहे का?
हो, काहीच हरकत नाही. मी पण घरी दळण्याचा प्रयोग करणार आहे. एकदा चकलीच्या भाजणीचे पीठ असेच घरी केले होते. पण खूप पटकन बारीक होत नाही, आणि चकलीला तर खूप बारीक पीठ लागते. त्यामुळे सपीटाच्या चाळणीने चाळावे लागले. पण वरील पीठ थोडे रवाळ चालेल त्यामुळे घरी दळले तरी चालू शकेल. पण घरी दळण्याचा खूप मोठा व्याप होऊन बसतो. शिवाय डाळी न धुता दळून आणल्यास चवीमधे फरक पडू शकेल असे वाटते.