या संमेलनाचा एक जाहीर न केलेला हेतू हा 'बिजिनेस' वाढवण्याचा असावा. ही सर्व मंडळी उच्चविद्याविभूषित असतातच. आणि नाहीतरी रोटरी क्लब, लायन्स क्लब हे कितीही उदात्त हेतूने चालू केले असले तरी त्यांतही धंदेवालेच घुसलेले दिसतात. मग यांनी का नाही करु ?
आपल्या जातीचा अभिमान ठेवणारे हे एकटेच नाहीयेत भारतात, गोवेकर, जाट, बंगाली जमीनदार असे कितीतरी आहेत. इतर जातीतले सुद्धा भरवतातच अशी संमेलने. फक्त तेंव्हा ते टीकेचा विषय नाही होत. पण या देशात काहीही निमित्त मिळाले की ब्राह्मण, समाजवादी, अंधश्रद्धा न पाळणारे नास्तिक यांना ठोकून काढण्याची एकही संधी दवडली जात नाही.
जातिव्यवस्था संपून खरी समानता येणे हे आदर्श स्वप्न आहे. (नेहरुंना जसे पंचशीलाचे पडले होते) प्रत्यक्षांत मात्र तसे होताना दिसत नाही. सरकारच ते होऊ देत नाही, राजकीय पक्षांना तर हे होणे परवडणारच नाही.
         खरा 'चित्त' पावन असलेला  य देशांतच काय या जगांत तरी शोधून सापडेल काय ?

--- हरणटोळ (नांवावरुनच जात ओळखेल)