आनंदघन यांनी मांडलेला मुद्दा पटला. चित्तपावन ह्या शब्दाची व्याख्या करणे आवश्यक आहे.
मला स्वतःला असे वाटते की आपण ज्या संस्थेचा भाग आहोत, मग तो आपला धर्म असो, जात असो किंवा अगदी शाळा, शहर, देश असो, आपण सर्वच त्या संस्थेनुरूप आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच, जागतिक मराठी परिषद, नाट्य संमेलन, साहित्य संमेलने होतात. ह्याचा अर्थ असा नसतो की मराठी, नाट्य्कर्मी किंवा साहित्यिक हेच सर्वश्रेष्ठ आहेत आणि उरलेले कनिष्ठ आहेत.
मी स्वतः ह्या संमेलनाचा कार्यकर्ता नसलो किंवा सहभागीही होणार नसलो, तरी असे संमेलन भरवणे ही वाईट गोष्ट आहे असे नक्कीच वाटत नाही. आपल्या ज्ञातीबांधवांना भेटणे आणि ओळखी वाढवणे ह्यात काहीच वाईट नाही आणि प्रत्येकाने ते करावे. चित्तपावनेतरांना कमी लेखणे हा ह्या संमेलनाचा उद्देश नसाव असे वाटते. जसे आपण सर्वजण आपापल्या कुटुंबियांना भेटतो तशाच प्रकारचा हा प्रयत्न असावा असे वाटते.
मी चित्तपावन नावाच्या याहू समूहाचा सभासद आहे. त्यावरून संमेलनाची जी माहीती मिळते त्यावरून ह्या एकत्र येण्यात काही वावगे आहे असे वाटत नाही. ज्या लोकांना अशा एकत्र येण्यात काही वावगे बाटते त्यांना आजून बऱ्याच गोष्टी वावग्या वाटायला हव्यात. असा उल्लेख मनोगतावर तरी दिसला नाही.
- कोहम