सर्वसाक्षींचा नेहमीप्रमाणे चित्रमय लेख. त्यातील बरेच संदर्भ नव्याने लागले. 'संपत सोमवार' ला अर्धी शाळा हे तर पूर्णपणे विसरलो होतो. पेठकरांची पुस्तीही मस्तच.
एकंदरीत पुन्हा एकदा स्मरणरंजनाचे आणि खाद्यपुराणाचे दिवस आले आहेत तर. छान. पेठकरकाका आणि चित्तरंजन, आता श्रावण संपला की एखादी चमचमीत वऱ्हाडी पाककृती द्या बुवा. तोंड अगदी भिजवलेल्या साबुदाण्यासारखे झाले आहे.
दिगंभांचे शब्द उसने घेऊन सर्वसाक्षींचे वर्तमानकाळात (तेही भूतकाळातील लेखातून आलेल्या) स्वागत.