लृ हा वर्ण संस्कृतोद्भव आहे. तो फक्त ह्रस्वच असतो. दीर्घ नसतो. कुशाग्रांनी दिलेल्या माहितीला थोडीशी जोड--
मराठीत वापरला जाणारा क्लृप्ती हा शब्द संस्कृतच आहे. संस्कृतमध्ये नुसता लृ वर्ण कृष्ण ह्या अर्थाने वापरला जातो(पण हा अर्थ प्रसिद्ध नाही.)
लृ हा स्वर आहे. व्यंजन नाही.
वाङ्मय ह्या शब्दात अनुस्वार वापरला जात नाही कारण तिथे अनुस्वाराच्या ऐवजी आलेला ङ नसून
वाच्+मय =वाक्+मय=वाङ्+मय=वाङ्मय
असा संधियुक्त शब्द आहे.