१. मी ऐकल्याप्रमाणे काही ठिकाणी ठरलेले मंडळच त्या त्या ठिकाणी दहीहंडी फोडण्यास सफल होते. ह्यामागचे कारण असे ऐकले, तिथे सुरुवातीला दहीहंडी खूप उंचावर लावलेली असते. मग बहुतेक गोविंदा असफल झाले की हळूह्ळू ती हंडी कमी उंचीवर आणण्यात येते. तोपर्यंत हे गोविंदा पथक तिथे पोहोचतेच, आणि त्यांना त्याचा फायदा होतो (की करवून दिला जातो?) चू.भू.द्या.घ्या.
२. बाकी दहीहंडीचे बाजारीकरण हे तर झालेच आहे. पण त्यात समाजाशी, निसर्गाशी समतोल ठेवून सर्व करणे गरजेचे आहे असे मला वाटते. उदा. दहीहंडीच्या वेळी पुर्वी घराघरातून बादल्यांतून पाणी गोविंदांवर फेकले जात होते. परंतु आज काल एक दोन पाण्याचे टँकर/बंब दही हंडी जवळ ठेवून त्यातून पाणी गोविंदांवर उडविले जाते. हा पाण्याचा अपव्यय टाळता येऊ शकतो.
३. दहीहंडीचे मूळ हे कृष्णापासून आहे. माझ्या माहीतीप्रमाणे, त्यात कृष्ण आणि त्याचे सवंगडी सामील होत. त्यात कोणी मुली नसत. (जर हे चुकीचे असेल तर माफ करा.) परंतु आजकाल फक्त मुलांशी बरोबरी करण्याकरीता मुलींचे दहीहंडी मंडळ बनवून दहीहंडी फोडणे मला पटत नाही. (काही गोष्टी जशा आहेत त्या तशाच राहिल्या तर त्यात मजा असते.)