उल्लेखनीय:
* निसर्गवाचन
* जंगलाचं देणं
* पक्षी जाय दिगंतरा
* पाखरमाया
* रानवाटा
* निळावंती
* शब्दाचं धन
* घरट्या पलिकडे
* चकवाचांदण (आत्मचरित्रपर)
त्यांना वाचणे हा एक आनंददायी अनुभव असतो. आपण वर दिलेल्याप्रमाणे जंगल, पशु, पक्षी ह्यांविषयींची अद्भुतरम्य माहिती तर असतेच, शिवाय ती ते ज्या नम्रपणे विशद करतात, ते कुठेतरी आत पोहोचते. तसेच त्यांची मराठी शब्दयोजना, विषेशतः पशुपक्षांना, झाडांना, वनस्पतिंना दिलेली नावे सहजसुंदर आहेत. मन भरकटत असेल, तर चित्तमपल्ली वाचावे, एकदम शांत व उल्हसित वाटते, असा निदान माझातरी अनुभव आहे.