आदरणीय द्वारकानाथजी, अशुतोष व कडुलिंब यांस,

दोन्ही देशांत शांतता निर्माण झाली तर कोणाला नको आहे. इतिहासाचे धडे विसरून पुन्हा-पुन्हा एखाद्याला प्रेमाने कवटाळायचे आणि त्याने पुन्हा-पुन्हा पाठीत सुरा खुपसायचा याला त्या कवटाळणार्‍याचा शुद्ध मूर्खपणाच म्हणू नये काय?

मोहालीच्या क्रिकेट सामन्यासाठी प्रेक्षक म्हणून आलेले पाकिस्तानी "बांधव"(??) ठरलेल्या तारखांना परत गेलेले नाहीत व १०० कोटींच्या लोकसंख्येतून त्यांना शोधून काढणेही अता शक्य नाही. त्यांनी उद्या घात-पात घडवून आणले तर जबाबदारी कोणाची?

पाकिस्तान या बसमधून अतिरेक्यांना भारतात पाठवणार नाही हे कशावरून? किती प्रवाशांच्याकडे पारपत्रासारखी भरवश्याची कागदपत्रे आसणार आहेत?? आलेल्या पाहुण्यांना परत पाठवण्याची जबाबदारी कशी पार पाडली जाणार आहे??

या व यातून उद्भवणार्‍या अनेक संकटांचा विचार न करता हुरळून जाणारे आणि या संकटांची जाणीव असणार्‍या सुभाषरावांसारख्यांच्या तळमळीला न समजून घेता त्यांना फक्त हिंदुत्ववादी म्हणून हिनवण्याचे काम करणारे दुर्दैवीच नव्हेत काय?

अशा अत्माभिमान विसरलेल्या समाजात अभिमानाने जगण्यासाठी धडपडणारे सुभाषांसारखे सुद्धा दुर्दैवीच नव्हेत काय?

----

सुभाषराव,

देशाला संकटात लोटणारे निर्णय घेण्यापासून रोखण्याची जबाबदारी विरोधी पक्षात असणारे शिवसेना-भाजप सारखे पक्ष वा संघपरिवारातील राष्ट्रवादी संस्था यांचीच नसून प्रत्येक सुजान, जागरुक व डोळस भारतीयाची आहे असे मला वाटते.

आपला,

(दक्ष) भास्कर