मी काही कोकणस्थ / चितपावन नाही आणि व्यक्तिगत जातच मानत नाही. पण बंड्यांनी म्हणल्याप्रमाणे फक्त एकाच समुहातील लोकांवर टिका करण्यापेक्षा अशी सर्वच जातीनिहाय संमेलने बंद करावीत. तसे जमत नसल्यास या संमेलनास नावे ठेवू नयेत. आनंदघन यांनी विचारलेले प्रश्न कितीही योग्य असले तरी ते फक्त एकाच समुदायाच्या अशा कार्यक्रमांना विचारणे बरोबर वाटत नाही. इतर जातीची अशी अनेक संमेलने होतात त्याची आपण दखल घेत नसलो तर याचीपण घेऊ नका. जो पर्यंत सर्व कायदेशीर आहे तो पर्यंत काही चूक समजायचे कारण नाही असे वाटते.
अवांतर: ऐकीव माहीती प्रमाणे, स्वातंत्र्य्पूर्व काळात अनेक कोकणस्थ ब्राम्हण वेगवेगळ्या प्रकारे ब्रिटीशांच्या विरुद्ध लढत असल्याने, ब्रिटीश त्यांना "कोब्रा" म्हणू लागले...